जगात कोण कुठे व कसा भेटेल
कौरवांच्या नाशानंतर भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, माझी शेपूट हलवून बाजूला कर म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.
मी एकदा सोलापूर रस्त्याने पुण्याला गाडीतून एकटाच येत होतो. संध्याकाळी सहाचा सुमार होता. हायवेला भांडगावच्या एका मंगल कार्यालयातले लग्नकार्य आटोपले होते. कार्यालयाच्या दारात “बुढ्ढीके बाल” विकणारा पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना लिफ्टसाठी हात करत उभा होता.
काळा पिवळा चौकडीचा हाफ शर्ट, पायात साध्याशा चपला, खांद्यावरच्या दांडीला ५-१५ बुढ्ढीके बाल च्या पिशव्या लटकवलेल्या, खांद्याला रिकामी शबनम झोळी. म्हटलं आज याला AC गाडीतून lift द्यावी. हा तरी कधी गाडीत बसणार ? त्याच्यासाठी गाडी थांबवल्याचे त्याला आश्चर्य वाटले. तो गाडीत बसला व माझी बडबड सुरू झाली. त्याचं नाव बबलू, तो हडपसरला भाड्याने रहात होता.
काय काय विकता ?
– बुढ्ढी के बाल, साबणाचे बुडबुडे व साधे मोठे फुगे.
दिवसाला किती बुढ्ढीके बाल विकले जातात ?
– तीन एकशे. ५ रुपयाला एक.
ते कसे बनवतात ?
– मग बबलूने ती process सांगितली. २ किलो साखरेतून तीनशे पिशव्या बनतात वगैरे.
२ किलो साखर म्हणजे – – –
– फारतर १०० रुपये आणि या पिशव्या विकून त्याला १५०० रुपये मिळत होते. म्हणजे १४०० रुपये नफा .. दिवसाला. म्हणजे महिन्याला ? माझ्या डोक्यात आकडेमोड वेगाने सुरू झाली. आणि बुडबुडे व फुगे कुठेत ?- संपले.
त्यांच्यातही कमीतकमी १००% नफा होता. बबलूच्या दिवसाच्या नफ्याचा आकडा माझ्या कल्पेनेपेक्षा खूप मोठा होत चालला होता.
इथे कसे काय ?
– लग्न असलं की विक्री चांगली होते. पुण्यापासून (१०० किलोमीटर दूर असलेल्या) इंदापूरपर्यंतच्या सर्व मंगल कार्यालयांच्या मॅनेजरशी माझे कॉंट्रॅक्ट आहे. मी फोननुसार विक्रीला आलो की मॅनेजरला १०० रुपये द्यायचे. … उन्हाने रापलेला, साधासा दिसणारा पण दिवसाकाठी किमान २ ते ३००० रुपये नफा करणारा बबलू सांगत होता.
पण इतक्या सर्वांशी कॉंट्रॅक्ट करून काय उपयोग ?
तू तर एकाच ठिकाणी जाऊ शकतो. माझा सवाल.
– मुलं ठेवली आहेत ना….
त्याचं शांत उत्तर.
गावचीच १८-२० मुलं आहेत. २ खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. मेहुणा मार्केटिंग करून raw material आणतो. मी सगळ्यांसाठी बुढ्ढीके बाल बनवतो. मुलांना महिना १०-१२,००० पगार देतो ….
माझ्या डोळ्यांसमोर आकडे नाचत होते. हा माणूस महिना २ लाख रुपये पगार वाटतो. आणि रहाणं, खाणं, पिणं वगळता प्रत्येक मुलामागे महिना ७०-८०,००० रुपयांचा नफा कमावतो. अशी १८-२० मुलं. म्हणजे स्वत:सकट महिन्याला याचा निव्वळ नफा?
दिल्लीजवळ मीरतला रहातो. तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादाने तीन मजली इमारत आहे,२ गाड्या आहेत. बबलू सांगत होता, मी बधिर होऊन गाडी चालवत होतो.
४-५ दिवसांनी मी व बायको म्हात्रे पुलाजवळ dp road वर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारीच मंगल कार्यालय होतं. दारात एक मुलगा बुढ्ढीके बाल विकत उभा होता.
मी त्याच्याजवळ गेलो नी विचारलं कुठे रहातोस ?
तो म्हणाला : हडपसरला
बबलूकडे का ?
तो चकित.
भीमाच्या ताकदीचे पार गर्वहरण झालं होतं.
तात्पर्यः
ह्या जगात कोण कुठे व कसा भेटेल हे त्याच्या राहणीमानाचा जर विचार करुन तुम्ही त्याची तुलना केली तर त्यात आपल्यालाच खाली बघायची वेळ येऊ शकते हे नेहमी लक्षात ठेवावे .
संकलित गोष्ट : Whatsapp ग्रुप
Nice story