टाटा नावाचा ब्रँड
श्री शिशिर मिश्रा ह्यांच्या एका अदभुत पोस्ट वर आधारित….
मी नऊ वर्षांचा होतो ! आम्ही त्या सुमारास, मुंबईत कुलाब्याला नौदलाच्या कॅन्टोन्मेंट वसाहतीत राहत होतो.त्या वसाहतीला लागून, युनायटेड सर्व्हिसेस क्लबचे, अरबी समुद्राला लागून, विस्तीर्ण असे गोल्फचे मैदान होते. अनेकदा, तिथे टाटा ,गोल्फ खेळताना , आम्हा मुलांना दिसायचे.एका रविवारच्या प्रसन्न सकाळी, मला स्पष्ट आठवते, आम्ही मुले आमच्या सायकली दमटवत असताना, टाटा , गोल्फच्या मैदानावर ‘ tee off ‘ च्या तयारीत होते. अगदी त्याच वेळी, तिकडून एक तरुण नाविक अधिकारी चालला होता. आम्हाला थांबवत आणि टाटानकडे
उंगलिनिर्देश करीत, आम्हाला सांगु लागला…
” मुलांनो ! त्यांना नीट बघून घ्या ! लोक आयुष्यात बक्कळ धन कमवतात, पण त्यांच्या इतका मान खुप कमीजणाना मिळतो. “
पंधरा वर्षांनंतरचा काळ ….
बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, ह्या कंपनीत मी नुकताच कन्सल्टंट म्हणून रुजू झालो होता.टाटा मोटर्स बाजारात, एक नवीन ट्रक चे मॉडेल आणणार होते , त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणुन आमचा ग्रुप , टाटा मोटर्स साठी वेगवेगळी माहिती संग्रहित करीत होता.त्या निमित्ताने, मी बरेच वेळा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तर पूर्व भारतात, खूपदा दुर्गम भागात , जेथे ट्रक ड्रायव्हर विश्रांती साठी थांबत , त्यांना गाठत असे, त्यांच्याशी दोस्तांना करून, त्यांच्या बरोबर जेवता जेवता, प्रसंगी एक दोन पेग घेत, मला हवी असलेली माहिती काढून घेत असे. अशा,जवळ जवळ ५०० ड्रायव्हर्स ना मी त्या वेळीं भेटलो होतो !
अशाच एका उत्साहवर्धक बैठकीत, मी एका ज्येष्ठ शीख ड्रायव्हरला मुद्दाम प्रश्न केला ( भारतात ,शीख संप्रदाय, ट्रक व्यवसायात अग्रेसर आहे )
” पापाजी ! राग मानू नका, पण इतर चांगले ट्रक, जसे भारत बेंझ, अशोक लेलँड, बाजारात आहेत, ते घसघशीत सवलती पण देत असतात,मग तुम्ही टाटान चे का बरे ट्रक पसंत करता? इतकी पसंती आणि ज्वाजल्य निष्ठा टाटा ब्रँड ला ? का बरे ? “
पापाजी शून्यात गेले. एक विसरु पाहणाऱ्या घटनेचे तरंग नकळत त्यांच्या डोळ्यात दिसू लागले आणि त्यांना धाप लागली…त्यांना आठवली ती एक १९८४ ची भयानक थंडी गोठवणारी रात्र, त्याच्या भावाला, घराला आणि त्याच्या ट्रक ला अचानक भस्मसात करणारी… कौटुंबिक, न भरून येणारे दुःख तर आभाळगत होते, पण पाच जणांचा उदरनिर्वाह ज्याच्यावर
अवलंबून होता, तो त्यांचा ट्रक पण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. संपूर्णपणे खचलेले, पापाजी , ते शहर सोडून, पंजाबातील गावी परतण्याचा विचारात होते..
इतक्यात काही दिवसानंतर, दंगलीची धूळ खाली बसल्यानंतर, टाटा मोटर्स चा एक कर्मचारी, त्यांच्या घरी आला. त्यांच्या हातात नवीन ट्रक च्या चाव्यांचा जुडगा देऊन निघुन गेला. एक ही कसला प्रश्न न विचारता !
पापाजी आणि त्यांच्या सारखे खुप शीख ड्रायव्हर्स, शीख विरोधी दंगलीत, आपले ट्रक गमवून बसले होते, जी त्यांची रोजी रोटी होती, अश्या असंख्य ड्रायव्हरना टाटा मोटर्स ने शोधून निःशुल्क ट्रक वितरीत केले होते.
ही घटना कुठेही छापून येणार नाही ह्याची संपूर्ण खबरदारी टाटा मोटर्सने त्या वेळी घेतली असताना देखील, अशा अभागी ट्रक ड्रायव्हरस च्या स्मृती पटलावर आज ही ती जणू कोरलेली आहे !
वरील सर्व घटनाक्रम कथन करताना पापाजीचे डोळे पाणावले होते आणि उलगडले गेले ते, टाटा ह्या ब्रँड बरोबर केलेल्या आजन्म कराराचे गुपित सुद्धा !
व्यवहारात सचोटी आणि दर्जा राखत , बाजारातील आपले अतुच्य स्थान प्राप्त करणाऱ्या समूहाप्रती ,तो होता पापाजीचा नितळ, पारदर्शक दिशादर्शक ठरेल असा लाखमोलाचा सल्ला ! नाही का ?
मित्रांनो ! तुमच्या व्यवहारातील उत्तोत्तम कार्यकुशलता आणि नेकी ची खरे तर भारताला गरज आहे , ती आपल्या उत्कर्षाची नांदी ठरेल !
अशा सुरस, वेधक कथा म्हणुनच मग सामान्यजनांना देशाच्या भवितव्याचा विचार करण्यास नक्कीच प्रवृत्त करतील हे नक्की !
( व्हॉटसअप वरील एका इंग्रजी पोस्टचा मराठी वाचकांसाठी स्वैर अनुवाद केला आहे. आवडला तर पुढे नक्की पाठवा ) 🙏🙏🙏
दिपक धारगळकर, बोरिवली ( प )