पॅन कार्ड बद्दल माहिती | PAN card about information in marathi

5/5 - (1 vote)

पॅन कार्ड बद्दल माहिती | Information about marathiPAN card in marathi

PAN CARD
PAN CARD

    पॅन कार्ड आहे भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचे झाले आहे. पॅन कार्डचा वापर हा प्रत्येक शासकीय कामात ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो. पॅन कार्ड गरजेचे असल्यामुळे ते आधार कार्ड सोबत लिंक करणे गरजेचे आहे.

    पॅन कार्ड बद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ या. पॅन कार्ड म्हणजे काय? पॅन कार्ड ऑनलाइन ऑफलाइन कसे अर्ज ( apply )करावे ? सुद्धा जाणून घेऊ.

 पॅन कार्ड (PAN CARD ) म्हणजे नेमकी काय?

 
    पॅन कार्ड हे स्मार्ट कार्ड च्या स्वरूपात मिळते. त्यावर लिहिलेल्या नंबरच्या अक्षराच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची संपूर्ण सर्व प्रकारचे आर्थिक माहिती काढली जाऊ शकते. एक प्रकारे पॅन कार्ड हे तुमची पूर्ण आर्थिक कुंडली आहे. ही माहिती आयकर विभागासाठी गरजेची असते.

पॅन कार्डचा (PAN CARD) फुल फॉर्म काय आहे?

 
    P –> PERMANENT
    A –> ACCOUNT
    N –> NUMBER
 
    पॅन कार्ड वरती दहा अंकाचा खास कोड असतो. त्यामध्ये काही इंग्लिश अक्षरे व इंग्लिश आकडे असतात. पॅन कार्ड हे स्मार्ट कार्ड च्या स्वरूपात प्राप्त होते. पॅन कार्ड साठी अर्ज केलेले लोकांना आयकर विभाग पॅन कार्ड देते. पॅन कार्ड तयार करताना त्या व्यक्तीचे सगळे आर्थिक व्यवहार विभागाच्या पॅन कार्डशी जोडले जाते. टॅक्स भरणे क्रेडिट कार्डद्वारे केलेले सगळे आर्थिक व्यवहार या सर्वांवर आयकर विभागाचे लक्ष असते.
 

    पॅन कार्ड वरील खास माहिती मराठी मध्ये

 
    पॅन कार्ड वर खातेदाराचे नाव व जन्मतारीख केलेली असते. पॅन कार्डच्या खास नंबर मध्ये तुमचे आडनावाचे सुरुवातीचे इंग्लिश अक्षर लपलेले असते. पॅन कार्ड वरील दहा नंबर पैकी पाचवा अंक तुमचे आडनाव दर्शवत असतो. आयकर विभाग त्याच्याकडे फक्त पॅन कार्ड धारकाचे आडनाव ठेवतो म्हणून आयकर विभाग पॅन नंबर मध्ये आडनावाची माहिती ठेवत असतो पण याबद्दल धारकांना माहिती देत नाही.
 
    पॅन कार्ड वरील नंबर विषयी संपूर्ण माहिती.
    १) पॅन कार्ड वर दहा अंकी नंबर टाकलेला असतो प्रत्येक पॅन कार्ड धारकांना दहा अंकी नंबर वेगळा असतो व तो नंबर आयकर विभाग ठरवून देतो.
    २) सुरवातीचे पहिले तीन इंग्लिश अक्षरे हे A ते Z मधील कोणतेही असतात.
    ३) छोटे अक्षर हे त्या व्यक्तीचा वर्ग दर्शवितो ते खालील प्रमाणे
 
    P –> वैयक्तिक धारकाचा
    F –> फर्म धारकाचा
    C –> कंपनी धारकाचा
    A –> AOP असोसिएशन ऑफ पर्सन
    T –> ट्रस्ट
    H –> HUF हिंदू एकत्रित कुटुंब
    B –> BOI बॉडी ऑफ इंडिविजुअल
    L –> स्थानिक Local
    J –> आर्टिफिशियल जुडीशियल पर्सन
    G –> गव्हर्मेंट (सरकारी व्यक्ती)
     पॅन कार्डचा होणारा वापर.
   पॅन कार्डचा वापर हा विविध क्षेत्रात होतो. आयकर विवरण भरताना, टीडीएस दाखवताना, परतावा मागतांना, तसेच आयकर विभागाबरोबर आर्थिक पत्रव्यवहार करताना पॅन कार्डचा वापर केला जातो. करताना पॅन कार्डचा नंबर असणे महत्त्वाचे असते. बँक खाते उघडण्यासाठी व बँकेतील मोठ्या रकमेच्या विवाहासाठी पॅन कार्ड आवश्यक असते. टेलिफोनची नवीन जोडणी करण्यासाठी, नवीन वाहन खरेदी करण्यासाठी वगैरे म्हणजेच जवळपास सगळ्याच व्यवहारांसाठी आता पॅन कार्ड आवश्यक आहे.
 पॅन कार्ड ऑनलाईन कसे काढावे ?
     ऑनलाईन पॅन कार्ड काढणे सोपे झाले आहे. तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाइन पॅन कार्ड काढू शकता. गव्हर्मेंटच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
 
    NSDL
 
   INCOME TAX
 
    पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
 
    १) फॉर्म सोबत 2 कलर फोटो
    २) ओळखीचा पुरावा
    ३) पत्त्याचा पुरावा
    ४) जन्मतारखेचा पुरावा
    तसेच UTI च्या केलेला अर्ज केंद्रात असलेला अर्ज भरुन आणि त्यासोबत वरील कागदपत्रे जोडून व फी देऊन पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पोस्टाने पॅन कार्ड घरी येते.
 
    तुम्हाला पॅन कार्ड बद्दल संपूर्ण सगळी माहिती दिली आहे जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आपल्या वेबसाईट बद्दल सांगा.

 

2 thoughts on “पॅन कार्ड बद्दल माहिती | PAN card about information in marathi”

Leave a Comment