राज्यातील २७१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय.
या ग्रामपंचायतींसाठी 16 ऑक्टोबर २०२२ ला मतदान होणाऱ्या व १७ ऑक्टोबरला मतमोजणी
राज्यातील जवळपास 62 तालुक्यांमध्ये २७१ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडतील याच ग्रामपंचायती निवडणुकांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे
नमस्कार मी हेमंत लहारे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत
तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती ग्रामपंचायतीचे निवडणूक आहेत ते बघूया
अनुक्रमांक | जिल्हा | जागा |
---|---|---|
१ | नाशिक | ४० |
२ | धुळे | ५२ |
३ | जळगाव | २४ |
४ | अहमदनगर | १५ |
५ | पुणे | १९ |
६ | सोलापूर | २५ |
७ | सातारा | १० |
८ | सांगली | १ |
९ | औरंगाबाद | १६ |
१० | जालना | २८ |
११ | बीड | १३ |
१२ | लातूर | ९ |
१३ | उस्मानाबाद | ११ |
१४ | परभणी | ३ |
१५ | बुलढाणा | ५ |
ही ग्रामपंचायत निवडणूक होते कशी ते आपल्याला बघायचे पण त्याआधी बघूया ग्रामपंचायत (Grampanchayat) कशी ठरते
त ज्या भागाची लोकसंख्या ही 1000 पेक्षा जास्त आहे आणि दरडोई उत्पन्न किमान दहा रुपये अशोक क्षेत्राला गाव म्हणून मान्यता दिली जाते अशा मान्यताप्राप्त गावात ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी लोकसंख्या किमान लोकसंख्या 600 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर दोन किंवा तीन गावात मिळून ग्रामपंचायत असते आणि तिला म्हणतात गट ग्रामपंचायलोकसंख्या 600 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर दोन किंवा तीन गावात मिळून ग्रामपंचायत असते आणि तिला म्हणतात गट ग्रामपंचायत. गावातील लोकसंख्येनुसारच निवडणूक अधिकारी गावचे बोर्ड म्हणजेच प्रभाग तयार करतात आणि त्यानुसार गावाची विभागणी ही वेगवेगळ्या बोर्ड मध्ये केली जाते. प्रत्येक वर्ड मध्ये समान लोकसंख्या असल्यावर भर दिला जातो.
लोकसंख्येनुसार प्रभागाची संख्या आणि ग्रामपंचायत सदस्य किती असावेत हे ठरवलं जातं. ग्रामपंचायतीच्या प्रभागांमध्ये विभागणी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करतात म्हणजे
लोकसंख्या | वार्ड | सदस्य |
---|---|---|
६०० ते १५०० लोकसंख्या | वार्ड ३ | सदस्य ७ |
१५०१ ते ३००० लोकसंख्या | वार्ड ३ | सदस्य ९ |
३००१ ते ४५०० लोकसंख्या | वार्ड ४ | सदस्य ११ |
४५०१ ते ६००० लोकसंख्या | वार्ड ५ | सदस्य १३ |
६००१ ते ७५०० लोकसंख्या | वार्ड ५ | सदस्य १५ |
७५०१ लोकसंख्या ते ७५०१ पेक्षा जास्त | वार्ड ६ | सदस्य१७ |
ज्या वार्ड मध्ये अनुसूचीत जाती आणि जमाती लोकांचीसंख्या जास्त आहे तो वार्ड राखीव ठेवला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना 50 टक्के तर अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात तर इतर मागासवर्गीयांना आता बार्न्डी आयोगाने सुचवल्याप्रमाणे आरक्षण दिलं जातं. त्यामुळे सर्वत्र सलग 27 टक्के आरक्षण नसतं. तसंच हे सर्व आरक्षण हे 50 टक्क्यांच्या वर जाता कामा नये. उमेदारच नाव गावातल्या मतदार यादीत कुठल्यातरी प्रभागात असणं आवश्यक असतं. अन्य गावाच्या मतदार यादीत असून चालत नाही. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी त्या व्यक्तींना वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावी आणि ती व्यक्ती किमान सातवी पास असणे गरजेचे आहे. गावातील मतदार हे गुप्त पद्धतीने ग्रामपंचायत सदस्याची यांची निवड करतात. सरपंचांची निवड ही या आधी निवडून आलेल्या सदस्यांमधून व्हायची पण राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार आता सरपंच निवड देखील थेट मतदारांमधून गुप्त मतदानाने होणार आहे. ग्रामपंचायत कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून पुढील पाच वर्षासाठी असतो
आता या निवडणुका संदर्भातल्या काही बेसिक प्रश्नांची उत्तरं बघूया
सरपंच पदाची निवड कशी होते ?
राज्य निवडणूक आयोगाने सदस्य पदाच्या निवडणुका घेतल्यानंतर जे विजय उमेदवार असतात त्यांची बैठक बोलावली जाते आणि त्या बैठकीतून सरपंचाची निवड होते आणि त्याच वेळेस उपसरपंचाची निवड होते परंतू ज्यावेळेस जनतेतून थेट सरपंच निवडला जातो. त्यावेळेस च्या निवडणुका मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने घेतल्या जातात.
ग्रामपंचायत निवडणुका या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप अशा पक्षांच्या चिन्हांवर नाही लढवता येत.
ग्रामपंचायत मध्ये मुक्त चिन्हाच्या आधारे निवडणुका लढवल्या जातात ही मुक्त चिन्हे राज्य निवडणूक आयोगाने नीच्छित केलेली असतात. त्या संदर्भात आधी सूचना प्रसिध्दी केलेली असते आणि ती आधी सूचना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावर किंवा संबंधीत निवडूनुक निर्णय अधिकाऱ्याकडे देखील उपलब्ध असते त्यातुनच निवडणूक अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ती चिन्ह वाटप करत असतो.
पॅनेल्स किवा गट पडतात ते राज्यकीय पक्षाशी संबंधित असतात का ?
ग्रामपंचायतीच्या निवडणुका कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हाच्या आधारे लढविल्या जातात नाही. त्या मुक्त चिन्हातून लढवील्या जातात. त्या वैयक्तिक उमेदवाराचं नाव आणि निवडणूक अधिकाऱ्याने नेऊन दिलेले चिन्ह एवढेच असते परंतु लोक आपसात एकत्र येतात आणि ते पॅनल तयार करतात किंवा त्यांचा गट तयार करतात आणि ते एकत्रितपणे निवडणूक लढवीत असतात.
ग्रामपंचायत सदस्यांना मानधन किती असते ?
आता सरपंच यांचा मानधन साधरण ३००० ते ५००० पर्यंत आहे. तसेच उपसरपंचचे मानधन १००० पासून ते २००० पर्यंत आहे. ते लोकसंख्या वर आधारित आहे आणि ग्रामपंचायत सदस्याला फक्त २०० रुपये हा बैठकीचा भत्ता मिळतो मासिक
अशाप्रकारे सरपंच उपसरपंच आणि सर्व प्रभाग सदस्य असे सगळे मिळून एक ग्रामपंचायत तयार होते. त्यामुळे छोट्याच खेडेगावाचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक पाहणे औसुक्याच निश्चित ठरते.