डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ इतिहास असा आहे

5/5 - (1 vote)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ आणि त्यांचा इतिहास असा आहे.

dr-babasaheb-ambedkar-married-dr-sharada-kabir

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून चर्चा होत असते ती प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांची.  कधी कधी आनंदराव आंबेडकर देखील चर्चेत येत असतात. कधी आंबेडकरांच्या घराण्यातील इतर लोकही चर्चेतच असतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीबद्दल अनेकांना माहितीच नाहीये.

आजच्या या ब्लॉग मधून आपण आंबेडकरांच्या वंशावळीबद्दल माहिती घेणार आहोत. नमस्कार मी हेमंत लहारे आणि तुम्ही वाचत आहे www.hemantlahare.com website.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव मेजर रामजी मालोजी सकपाळ. आंबेडकरांचे मूळ आडनाव सकपाळ आणि मुळगाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातलं आंबवडे.

हे गाव मेजर रामजी सकपाळ हे सैन्यात सुभेदार होते. त्यांचा विवाह सातारा येथील सुभेदार मेजर असणाऱ्या धर्मा रामनाथ मुरबाडकर यांची कन्या भीमाताई यांच्यासोबत झाला. रामजी आणि भीमाताई यांना एकूण 14 आपत्ती झाली.

पण त्यापैकी सात अपत्य अल्पवयातच दगावली होती. रामजी आणि भिमाई यांच्या अपत्यांची नावे आणि त्यांचा वंश विस्तार आपण पुढील फोटोंमधून पाहू शकतो.

Dr. babasaheb Ambedakar

रामजी आणि भिमाई यांच्या आठव्या (८) अपत्याचे नाव बाळाराम  नव्या क्रमांकाची (९) मुलगी तिचे नाव गंगाबाई दहावी (१०) रमाबाई अकरावी (११)आनंदराव बारावी (१२ )मंजुळा तेरावी (१३) तुळसाबाई आणि रामजी सपकाळ आणि भिमाई सकपाळ यांची चौदावे (१४ )आणि सर्वात धाकटे आपत्ती म्हणजे भीमराव रामजी सकपाळ अर्थातच बाबासाहेब आंबेडकर.

     आता पाहू या  सपकाळ आडनावाच आंबेडकर कसं झालं आणि डॉक्टर बाबासाहेबांचा वंश विस्तार कसा आहे ?

बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महूचा. रामजी सकपाळ तेव्हा मध्य प्रदेशातील नियुक्ती होते ते पुढे साताऱ्या मध्ये आले ७ नोव्हेंबर 19०० साली बाबासाहेबांना शाळेत दाखल करण्यात आलं.

त्याकाळी गावा च्या नावावरनं आडनाव लावण्याची पद्धत होती. कृष्णाची केशव आंबेडकर या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणजे भीमराव सतपाल. कृष्णाजी आंबेडकरांनी आपला आडनावस बाबासाहेबांचा आडनाव म्हणून जोडून टाकल.

अस हि सांगितल जात की बाबासाहेबांचे मूळ गाव आंबवडे असल्यामुळे बाबासाहेबांचा आडनाव म्हणून आंबेडकर लावण्यात आल.

डॉक्टर बाबासाहेबांनी हेच नाव कायम ठेवलं आणि इथूनच पूर्वाश्रमीची सकपाळ घराणं आंबेडकर घराणं म्हणून ओळखलं जाऊ लागल. ह्या घराण्यची ओळख भारतीय इतिहासाला घ्यावीच लागते ती डॉक्टर बाबासाहेबांच्या कामगिरीमुळे.

आता पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंश विस्तार

Dr. babasaheb Ambedakr

डॉक्टर बाबासाहेबांचं लग्न झालं ते भगिरीची भिकु धोत्रे यांच्यासोबत पूर्वाश्रमीचे भगिरीची लग्नानंतर रमाई झाल्या.

डॉक्टर बाबासाहेब आणि रमाई यांना एकूण पाच अपत्य. या पाच अपत्यांपैकी चार अपत्यांचा मृत्यू अल्पवयात झाला. त्यांची नावे रमेश, गंगाधर,  इंदू आणि राजरत्न यापैकी पाचव अपत्य म्हणजे यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर आणि यशवंत आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव मीराबाई. यशवंत आणि मीराबाई यांना पुढे चार अपत्य झाली. त्यापैकी तीन मुलं आणि एक मुलगी.

यातले पहिले अपत्य प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, दुसऱ्या रमाबाई, तिसरे भीमराव आंबेडकर आणि चौथे आनंदराज आंबेडकर आज हीच पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तिसरी पिढी म्हणून ओळखली जाते. प्रकाश आंबेडकर, रमाई तेल तुबंडे, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर या सर्वांचे आजोबा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

आता  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंतराव आणि यशवंतराव यांची मुलं अर्थातच बाबासाहेबांच्या तिसऱ्या पिढीबाबत विस्तारणे माहिती घेऊया.

बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत यांनी बाबासाहेबांची विचार पुढे नेले ते बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते विचारवंत आणि पदाधिकारी होते भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष देखील राहिले चैत्यभूमीचे जनक तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचे १९७७ सालीस निधन झालं त्यांच्या पत्नी मीराबाई यादेखील सामाजिक कार्यात सक्रिय राहिले आहेत. यशवंत यांचे चिरंजीव म्हणजे प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर तर मुलगी रमाबाई आंबेडकर यापैकी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना सक्रिय राजकारणी म्हणून आपण ओळखत असतो. वंचित बहुजन आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राज्यसभा आणि लोकसभेवर त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या त्यांच्या पत्नीचे नाव अंजली मायदेव. सुधाकर  देव यांच्या त्या कन्या. प्राध्यापक असणाऱ्या अंजली माय देव असा सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या विचारवंत म्हणून ओळखल्या जातात.

प्रकाश आंबेडकर आणि अंजली मायदेव यांचे एकुलते एक पुत्र म्हणजे सुजात आंबेडकर यांची हीच चौथी पिढी सुजात आंबेडकर यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स पूर्ण केल. तसेच चैन्नईच्या कॉलेजमधून पत्रकारिता शिक्षण देखील घेतले. सुजातने आपल्या वडिलांप्रमाणे स्वतःची राजकीय ओळख देखील निर्माण केली आहे.

यशवंत उर्फ भैय्यासाहेब यांचे  दुसरे चिरंजीव म्हणजे भीमराव उर्फ दादासाहेब आंबेडकर भीमराव हे भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्षआहेत.  तसेच ते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या पत्नीचे नाव दर्शना आंबेडकर.

भीमराव आणि दर्शना आंबेडकर यांना एकुलती एक मुलगी असून तिचे नाव कृतिका. कृतिका सध्या मुंबईमध्ये उच्च शिक्षण घेती. आता बोलूया यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या मुला बाबत आनंदराज आंबेडकर असते त्यांचं नाव आनंदराव आंबेडकर हे रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाचे अध्यक्ष यांची देखील स्वतंत्र अशी राजकीय ओळख आहे. सामाजिक राजकीय प्रश्नांवरती सातत्याने चर्चेत देखील असतात. आनंदराज आंबेडकर यांच्या पत्नीचे मनीषा. आनंदराज आणि मनीषा यांना दोन मुलं असून त्यांची नावे साहिल आणि अमन अशी आहे. आता जाणून घेऊ या  यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब यांच्या एकमेव कन्येबाबत रमाबाई तेल तुंबडे अशी त्यांची लग्ना नंतरची ओळख.  प्रख्यात लेखक विचारवंत तथा मानविधिकार कार्यकर्ते आनंद तेल तुंबडे यांच्या त्या पत्नी. एक विचारवंत म्हणून रमाबाई तेल तुंबडे याची अशी स्वतंत्र अशी ओळख आहे. रमाताई आणि तेल तुंबडे यांना दोन मुली प्राची आणि रश्मी. त्यापैकी प्राची तेल तुंबडे आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेयर म्हणून ओळखली जाते.

अर्थात पुन्हा एकदा संपूर्ण थोडक्यात वंश विस्तार पाहू या.

रामजी सपकाळ याचे चौदावे अपत्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र म्हणजे यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर.

भैय्यासाहेब आंबेडकरांना चार अपत्य प्रकाश, रमाताई, भीमराव, आनंदराज हीच बाबासाहेबांची तिसरी पिढी.

प्रकाशाचे चिरंजीव सुजात

रमाबाई यांच्या मुली प्राची आणि रश्मी

भीमराव यांची मुलगी कृतिका

आनंदराव यांची मुलं साहिल आणि अमर

म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौथी पिढी

सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू मुकुंदराव यांच्या पिढीने देखील आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. मुकुंदराव यांना अशोक, दिलीप, विद्याताई आणि सुजाताबाई अशी चार मुलं अशोक आंबेडकर यांची मुलं संदेश आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर. तसेच राजरत्न आंबेडकर देखील राजकारणात सक्रिय असतात तर असा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंश विस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा सन्मान करत सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांच्या पश्चात त्याच्या पिढीने योगदान दिल्याच दिसून येत. तुम्हाला हि माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment